वर्षभरातच सलमानच्या बहिणीचं लग्न मोडलं

बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राट हे दोघेही वेगळे झाल्याचे वृत्त आहे. खुद्द श्वेतानाही या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

Updated: Nov 22, 2015, 03:36 PM IST
वर्षभरातच सलमानच्या बहिणीचं लग्न मोडलं title=

नवी दिल्ली : बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राट हे दोघेही वेगळे झाल्याचे वृत्त आहे. खुद्द श्वेतानाही या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

गेल्याच वर्षी श्वेता आणि पुलकित विवाहबद्ध झाले होते. 'मी आणि माझे पती पुलकित आम्ही वेगळे राहत आहोत. कुटुंबासाठी पुलकितने माझ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. आमच्यासाठी कुटुंब गरजेचे असते. ते आपली लाईफलाईन आहे. त्याला जे हवंय ते दिलंय.त्यांनी कुटुंबासाठी मला सोडलं,' असं श्वेताने सांगितलं.

तीन नोव्हेबर २०१४मध्ये श्वेता आणि पुलकितचे गोव्यात लग्न पार पडले होते. सलमान खानने त्यावेळी श्वेताचे कन्यादान केले होते. यावेळी सलमानचा भाऊ अरबाज खान आणि अतुल अग्निहोत्रीही उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.