मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ज्वेलरीच्या व्यवसायात उतरणार आहे. लवकरच सलमान बिईंग ह्यूमन अंतर्गत ज्वेलरीचा ब्रँड लाँच करणार आहे, अशी माहिती सलमानची बहीण अर्पिता खानने दिली आहे.
सप्टेंबरमध्ये सलमान हा ब्रँड लाँच करणार आहे. सलमानच्या या ब्रँडची ज्वेलरी सामान्य व्यक्तींना परवडेल अशा किमतीमध्ये असेल असंही अर्पिता म्हणाली आहे.