सलमानचा 'बजरंगी भाईजान' आज पडद्यावर, 'बाहुबली'चा फटका?

ईदच्या मुहूर्तावर सलमान खान पुन्हा एकदा आपलं नशीब बॉक्स ऑफिसवर आजमावणार आहे. सलमान खानचा बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर आज दाखल झाला असून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झालाय. 

Updated: Jul 17, 2015, 09:13 AM IST
सलमानचा 'बजरंगी भाईजान' आज पडद्यावर, 'बाहुबली'चा फटका? title=

मुंबई: ईदच्या मुहूर्तावर सलमान खान पुन्हा एकदा आपलं नशीब बॉक्स ऑफिसवर आजमावणार आहे. सलमान खानचा बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर आज दाखल झाला असून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झालाय. 

मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाहुबली या भारतातील सगळ्यात जास्त बजेट असलेल्या सिनेमानं सलमानच्या चिंतेत भर घातलीये. बाहुबलीनं बॉक्स ऑफिसवर धमाका केला असून आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड या सिनेमानं तोडलेय. 

बाहुबली सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत तब्बल २१५ कोटींची कमाई केली असून हा जादूई आकडा गाठण्याचं काम अजून सलमान आणि शाहरुख खानलाही जमलेले नाहीये. एस. एस. राजमौली दिग्दर्शित हा सिनेमा जवळपास ४२०० थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून भारतातील सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा ठरलाय. 

त्यामुळं सलमानच्या बजरंगी भाईजानला बाहुबलीच्या तुलनेत कमी शो मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं पहिल्यांदाच ईदच्या दिवशी सलमानसमोर पेचप्रसंग उभा राहिलाय.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.