सलमानला 200 कोटींची ‘किक’

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खान अभिनित ‘किक’ या सिनेमानं 100 करोडोंच्या क्लबमधून एक्झिट घेतलीय... कारण, आता या सिनेमानं 200 करोडोंचा आकडाही पार केलाय.

Updated: Aug 5, 2014, 07:51 AM IST
सलमानला 200 कोटींची ‘किक’ title=

मुंबई : 25 जुलै रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खान अभिनित ‘किक’ या सिनेमानं 100 करोडोंच्या क्लबमधून एक्झिट घेतलीय... कारण, आता या सिनेमानं 200 करोडोंचा आकडाही पार केलाय.

सलमान खानचा हा आत्तापर्यंतचा सर्वात हीट सिनेमा ठरलाय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिलीय. यापूर्वी, सलमानच्या ‘एक था टायगर’नं 198 करोड रुपये कमावले होते. ‘किक’ हा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा सलमानचा पहिलाच सिनेमा ठरलाय.

200 करोडोंच्या क्लबमध्ये याअगोदर आमिर खानच्या थ्री इडियट्स आणि धूम-3 चा समावेश आहे. तर ऋतिक रोशनचा क्रिश-3 आणि शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेसनंही या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली होती.

सलमानचा ‘किक’ प्रदर्शित झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. 2014 सालात हा पहिला शुक्रवार ठरला जेव्हा एकही नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. त्यामुळे, दुसरा कोणताच ऑप्शन नसल्यानं रविवारपर्यंतच या सिनेमानं 198.11 करोड रुपये कमाई केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.