'बजरंगी'ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं

बजरंगी भाईजान चित्रपटाने दीडशे कोटी पर्यंत घौडदौड केली आहे, पहिल्या आठवड्यात शंभर कोटींचा टप्पा 'बजरंगी भाईजान'ने पार केला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'बजरंगी'ने कमाल केली आहे, रविवारी बजरंगी भाईजानने तब्बल ३९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Updated: Jul 22, 2015, 03:49 PM IST
'बजरंगी'ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं title=

मुंबई : बजरंगी भाईजान चित्रपटाने दीडशे कोटी पर्यंत घौडदौड केली आहे, पहिल्या आठवड्यात शंभर कोटींचा टप्पा 'बजरंगी भाईजान'ने पार केला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'बजरंगी'ने कमाल केली आहे, रविवारी बजरंगी भाईजानने तब्बल ३९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

आठवड्याच्या शेवटी बजरंगी भाईजानने २७ कोटींची कमाई करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे चित्रपटाचा ४ दिवसांचा गल्ला तब्बल १२९.६५ कोटी रुपये इतका झाला आहे.

ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहटा यांनी बजरंगी भाईजानने परदेशात ८ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल ५१ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती दिली आहे. 

मात्र याचवेळी मागील आठवड्यात रिलीज झालेला 'बाहुबली' हा सिनेमा बजरंगी भाईजानला तगडी टक्कर देत आहे. 'बाहुबली' हा चित्रपट एकाचवेळी तामिळ, तेलगूसह हिंदीत प्रदर्शित झालेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूमधडाक्यात वर्चस्व गाजवून आहे. बाहुबलीनं ३०० कोटींचा गल्ला ओलांडला आहे.

बॉक्स ऑफिसवरील पहिल्या ३ दिवसातील कमाई
शुक्रवार : २७ कोटींची कमाई
शनिवार : ३७ कोटींची कमाई
रविवार : ३९ कोटींची कमाई

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.