मुंबई : बॉलीवूडचा दबंग सलमान खानने पनवेल येथील फार्म हाऊसवर आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्थडे पार्टीला अवघं बॉलीवूड अवतरलं होतं.
सलमान खानच्या बर्थडे पार्टीत एकीने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. रोमानियातील अभिनेत्री लुलिया वेंतुर ही त्या पार्टीतली आकर्षनाचं केंद्र होतं.
सलमान आणि लुलिया यांच्यातील प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा सुरू आहे.
सलामानच्या बर्थ पार्टीत लुलिया अशी वागत होती जशी ती खान कुटुंबाचाच एक भाग आहे. संपूर्ण पार्टीत लुलिया सलमानसोबतच होती. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबियांचीही काळजी घेताना ती दिसून आली. पार्टीत आलेल्या प्रत्येकाची विचारपूसही लूलिया करत होती.
सलमान-लुलिया यांचा साखरपुडा झाल्याचीही चर्चा बॉलीवूडमध्ये होती. दोघेही पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही सध्या चांगलंच उधान आलंय.