सलमानचा मुंबई विमानतळावर राडा

अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. म

Updated: Jul 18, 2016, 05:09 PM IST
सलमानचा मुंबई विमानतळावर राडा  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मुंबई विमानतळावर सलमाननं कर्मचा-यांशी हुज्जत घातली आहे. दिल्लीला जात असताना सलमान खान उशीरा आला.  उशीरा आल्यानंतरही सलमाननं कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 

सलमान खान विस्तारा एअर लाईन्सनं दिल्लीतल्या एका कार्यक्रमाला चालला होता. विमानतळावर उशीरा पोहोचल्यानं सलमानला कर्मचाऱ्यांनी तिकडे थांबवलं, यामुळे भडकलेल्या सलमाननं राडा करायला सुरुवात केली. 

पुन्हा विस्तारा एअर लाईन्सनं कधीच प्रवास करणार नाही, असं सलमान या कर्मचाऱ्यांना म्हणाला. यानंतर सलमानला वेटिंग रूममध्ये पाठवण्यात आलं. अखेर एअर इंडियाच्या विमानानं सलमान दिल्लीला गेला.