सलमानचा सुलतान आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

ईद जरी उद्या साजरी होणार असली, तरी सलमान खानचा सुलतान आजच प्रदर्शित होतोय. ईद नेहमीच सलमानसाठी लाभदायी ठरली आहे..त्यामुळे सुलतानचीही जबरदस्त हवा निर्माण झाली आहे.

Updated: Jul 6, 2016, 12:45 PM IST
सलमानचा सुलतान आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : ईद जरी उद्या साजरी होणार असली, तरी सलमान खानचा सुलतान आजच प्रदर्शित होतोय. ईद नेहमीच सलमानसाठी लाभदायी ठरली आहे..त्यामुळे सुलतानचीही जबरदस्त हवा निर्माण झाली आहे.

ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या दबंग खान सलमानच्या सगळ्याच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे..ईद आणि सलमानचा ब्लॉकबस्टर सिनेमा असं जणू समीकरणचं जुळलं आहे.

ईदच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा बुधवारी सिनेमा प्रदर्शित करण्याची रिस्क सलमानने घेतली आहे.त्यामुळे यंदा सलमानचा सिनेमा कोणते नवे रेकॉर्ड तोडतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.