सैराट या चित्रपटांना मागे टाकणार?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये वेगात धावतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने रेकॉर्ड बनवण्यास सुरुवात केली होती. 

Updated: May 7, 2016, 05:38 PM IST
सैराट या चित्रपटांना मागे टाकणार? title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये वेगात धावतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने रेकॉर्ड बनवण्यास सुरुवात केली होती. 

पहिल्याच वीकेंडमध्ये सैराटने तब्बल १५ कोटींची तुफान कमाई केली. लोकांना तर या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलंय. त्यातील गाणी, संवाद, फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतायत. 

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २५ कोटींची कमाई केली. जाणकारांच्या मते हा चित्रपट ५० कोटींहून अधिक कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड आतापर्यंत नटसम्राट या चित्रपटाच्या नावे आहे. लवकरच हा विक्रमही सैराट मोडून काढेल अशी शक्यता आहे. 

सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट
नटसम्राट – 40 कोटी
लय भारी – 38 कोटी
कट्यार काळजात घुसली – 31 कोटी
टाईमपास 2 – 28 कोटी
टाईमपास – 32 कोटी
दुनियादारी - 26 कोटी