नाशिकमध्ये प्रेक्षकांचा 'सैराट' गोंधळ

सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झालेत. असंख्या चाहत्यांचे प्रेम या जोडीला मिळतेय.

Updated: May 16, 2016, 01:48 PM IST
नाशिकमध्ये प्रेक्षकांचा 'सैराट' गोंधळ title=

नाशिक : सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झालेत. असंख्य चाहत्यांचे प्रेम या जोडीला मिळतेय.

मात्र नाशिक शहरातील प्रेक्षकांच्या सैराट गोंधळामुळे आर्ची आणि परश्याला दोन मिनिटात स्टेज सोडण्याची वेळ आली. 

धन्वंतरी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील फॅशन शोसाठी सैराटची ही जोडी उपस्थित होती. मात्र विद्यार्थ्यांसोबत प्रेक्षकही घुसल्याने शो झालाच नाही. कार्यक्रम संपला असं घोषित करत प्रेक्षकांना पांगवण्यात आलं.