सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स

अर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे.

Updated: May 15, 2016, 10:17 PM IST
सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स title=

मुंबई : अर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे. सैराट सिनेमाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन नुकतचं जे.डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्ग्ज उपस्थित होते.

सिनेमातील झिंगाट या गाण्यावर सगळेच यावेळी थिरकले. अंकुश चौधरी, रवी जाधव, अमृता खानविलकर यांच्यासह सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी झिंगाट या गाण्यावर धमाल डान्स केला.

३ आठवड्यात सैराटने ५५ कोटींची कमाई करत एक नवा विक्रम रचला. अजूनही सिनेमागृहांमध्ये सैराटला चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे सैराट अजून किती मोठी झेप घेतो याची उत्सुकता अनेकांना लागली असेल. 

पाहा व्हिडिओ