मुंबई : अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियासोबतचा फोटो ट्विट करून आपल्या लाडक्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.
शुक्रवारी म्हणजेच, ५ ऑगस्ट रोजी जेनेलियाचा वाढदिवस होता. त्यामुळे हॅप्पी बर्थडे बायको असं म्हणत रितेशने फोटो पोस्ट केला. तुझ्या चेहऱ्यावरील हसू पाहून मला जो आनंद होतो तो इतर कुठलाही गोष्टीने होऊ शकत नाही, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.
रितेश ट्विटरवर नेहमी जेनेलियाचा उल्लेख 'बायको' असा करत असतो... पण यावेळी पहिल्यांदाच जेनेलियाने 'थँक्यू नवरा' असं म्हणत त्याला उत्तर दिलं.
Happy Birthday Baiko @geneliad - nothing makes me happier than seeing you smile. Have the bestest one. #HBDGenelia pic.twitter.com/PT7GfExh79
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 4, 2016
Thank you Navra.. Ur the reason I smile always .. Love you so much https://t.co/IYsNdaRZR2
— Genelia Deshmukh (@geneliad) August 5, 2016