मुंबई : उत्तरप्रदेशच्या अलाहाबादमध्ये एका सार्वजनिक शौचालयाला आपलं नाव दिलं गेलंय, हे ऐकून ऋषी कपूर यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल बरं...
काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे कृत्य समजल्यानंतर ऋषी कपूर अजिबात चिडलेले नाहीत... आपण काहीतरी कामी येतोय, याचंच त्यांना समाधान वाटतंय.
काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील अनेक सार्वजनिक संपत्तींना गांधी कुटुंबातील सदस्यांची नावं देण्यावरून कपूर यांनी नुकतीच ट्विटरवर आगपाखड केली होती. त्यांना वाद सुरू झाला... आणि त्याचं प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक टॉयलेटलाच ऋषी कपूर यांचं नाव देऊन टाकलं.
यावर प्रतिक्रिया देताना, 'मी खूश आहे. कमीत कमी मी कुणाच्या काही कामी तरी येईल. हे लोक तर कुणाच्याही कशालाही कामी येणार नाही. मला गर्व आहे की सुलभ शौचालयाचं नाव माझ्या नावावर ठेवण्यात आलंय. कारण हीच सध्या पंतप्रधान मोदींची महत्त्वकांक्षी योजना आहे' असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय.