अभिनेते ऋषि कपूर रूग्णालयात दाखल

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना मलेरिया झाल्याचं सांगण्यात येतंय, त्यांना लवकरच  रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 30, 2014, 06:59 PM IST
अभिनेते ऋषि कपूर रूग्णालयात दाखल title=

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना मलेरिया झाल्याचं सांगण्यात येतंय, त्यांना लवकरच  रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

६२ वर्षीय ऋषि कपूर यांनी बुधवारी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऋषि कपूर यांना काल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, सुरूवातीला त्यांना डेंग्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

मात्र त्यांना मलेरिया असल्याचं आता सांगण्यात येतंय, त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना आज घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.