चाहत्यांना लाठीमार झाल्याबद्दल दुःख झालं रिंकू राजगुरूला...

 सैराटमुळे एका रात्री स्टार झालेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांनी कवठेमहांकाळ येथे गर्दी केली आणि पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी  लाठीमार केला होता. यामुळे रिंकू राजगुरूला खूप दुःख झालं. 

Updated: May 11, 2016, 04:56 PM IST
चाहत्यांना लाठीमार झाल्याबद्दल दुःख झालं  रिंकू राजगुरूला... title=

मुंबई :  सैराटमुळे एका रात्री स्टार झालेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांनी कवठेमहांकाळ येथे गर्दी केली आणि पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी  लाठीमार केला होता. यामुळे रिंकू राजगुरूला खूप दुःख झालं. 

स्वप्नातही विचार केला नव्हता.. 

सैराट चित्रपटाला इतकी प्रसिद्धी मिळेल. लोकांना माझं काम इतकं आवडेल हा हा स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळे हे स्वप्नचं वाटतं आहे. खूप छान वाटतो आहे. 

लाठीमार झाला हे खूप वाईट झालं

चाहत्यांनी मला पाहण्यासाठी गर्दी केली तेव्हा खूप भारी वाटलं. पण त्यानंतर कळलं की खूप गर्दी झाली होती.  त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला, मला खूप वाईट वाटलं, असे रिंकूने झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

पाहा मुलाखतीत नेमकं काय म्हणाली होती, रिंकू...