अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आर्ची-परशाचेही मेणाचे पुतळे

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची-परशाचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कलावंत सुनील कंडलूर यांनी हे काम हाती घेतले आहे.

Updated: Aug 12, 2016, 04:14 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आर्ची-परशाचेही मेणाचे पुतळे title=

लोणावळा : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची-परशाचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कलावंत सुनील कंडलूर यांनी हे काम हाती घेतले आहे.

लंडन येथील मादाम तुसॉं या वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी लोणावळ्यातही वॅक्स म्युझियम उभारण्यात आले. आतापर्यंत अनेक लोकप्रिय व्यक्तींचे मेणाचे पुतळे इथे तयार करण्यात आले आहेत. महात्मा गांधी, शिवाजी महाराज, अण्णा हजारे, कपिल देव, अमिताभ बच्चन यांचा यात समावेश आहे.

मराठी चित्रपटाला १०० कोटींची स्वप्न दाखवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. नागराज मंजुळे हे सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूला कलाकार म्हणून पहिली संधी दिली. त्यामुळेच आज आर्ची आणि परशा ही महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी बनली आहे.

आकाश, रिंकू आणि नागराज यांचे मोजमाप घेऊन झाले असून पुढच्या दोन महिन्यांत हे पुतळे तयार होणार आहेत.