'त्या' गाण्यात रिहा कपूरने केला सोनम कपूरचा गेटअप?

मुंबई : 'कोल्डप्ले' या ब्रिटीश बँडच्या 'हिम फॉर द वीकेण्ड' या गाण्याचा व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा राहिली. 

Updated: Jan 30, 2016, 12:32 PM IST
'त्या' गाण्यात रिहा कपूरने केला सोनम कपूरचा गेटअप? title=

मुंबई : 'कोल्डप्ले' या ब्रिटीश बँडच्या 'हिम फॉर द वीकेण्ड' या गाण्याचा व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा राहिली. या गाण्यात हॉलिवूडमधील गायिका आणि अभिनेत्री बियॉन्से मुख्य भूमिकेत दिसली.

पण, त्याशिवाय भारतीय अभिनेत्री सोनम कपूरही या गाण्यात झळकली. या गाण्यातील सोनमच्या लूक्सबद्दल चर्चा रंगत आहेत. पण, तिला हा लूक दिलाय तिची बहीण असलेल्या रिहा कपूरने.

रिहाने याबद्दल एक इंस्टाग्रामवर सोनमचा एक पडद्यामागील फोटो शेअर केलाय. सोनम या गाण्यात एका भारतीय स्त्रीच्या पारंपरिक पोशाखात दिसली आहे.

या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मुंबईतील विविध ठिकाणांवर झाले असून त्यात मुंबईचे अनेक रंग खुलले आहेत.

 

Behind the scenes with @sonamkapoor @coldplay and Ben Mohr!

A photo posted by @rheakapoor on