तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?

दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

Updated: Sep 17, 2014, 02:49 PM IST
तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय? title=

मुंबई : दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

याच सिनेमातील एका दृश्यात रेखा अमिताभचा अंदाज पेश करताना दिसणार आहे. अमिताभची नक्कल रेखा कशी करते, हे पाहण्यासाठी नक्कीच तुम्हीही उत्सुक असाल.

रेखा अमिताभ बच्चननं ‘अग्निपथ’ सिनेमात म्हटलेलं ‘हाय’ म्हणताना दिसेल. रेखाचा हा अंदाज नक्कीच पाहण्यासारखा असेल.

सुपर नानीमध्ये रेखा मुख्य भूमिकेत म्हणजेच आजीच्या भूमिकेत दिसेल. तर तिचा नातू असेल अभिनेता शर्मन जोशी... शर्मननं आपल्या आजीला एक मॉडेल बनण्यासाठी प्रोत्साहित करतो... आणि मग सुरु होते ‘सुपर नानी’ची धम्माल...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.