आता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?

बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय. 

Updated: Oct 13, 2014, 05:49 PM IST
आता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी? title=

मुंबई: बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय. 

एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार रणबीर-कतरीना दिवाळी थायलंडमध्ये साजरी करणार आहे. अनुराग बसूच्या फिल्मचा मुख्य भागही ते शूट करणार आहेत. रणबीरचं नुकतंच एक छोटं ऑपरेशन झालंय. मात्र तरीही रणबीर आराम करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीय. 

हे दोघंही 22 ऑक्टोबरला थायलंडसाठी रवाना होतील. ऑपरेशन झालेल्या रणबीरची कॅट चांगलीच काळजी घेतेय असंच म्हणावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.