मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ यांच्यात आता कोणतंही रिलेशन राहिलेलं नाही. दोघांमध्येही ब्रेकअप झालं आहे. रणबीरने त्याचा कार्टर रोड येथील फ्लॅट देखील सोडला आहे. जेथे तो कॅटरीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रणबीर आता त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
सलमान खानमुळे ब्रेकअप झाल्याचं देखील म्हटलं जात होतं. ब्रेकअपनंतर ती सलमानला भेटायला गेली त्यामुळे या चर्चा अजूनच रंगू लागल्या.
दीपिका आणि रणबीर यांच्यात जवळीकता वाढत असल्याने देखील दोघांमध्ये काहीही अलबेल नाही अशा चर्चा देखील अनेक दिवस रंगल्या. पण दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं वेगळंच कारण आता समोर येत आहे.
कपूर परिवार हे दोघांच्या ब्रेकअप मागचं कारण असल्याच्या आता चर्चा आहेत. कपूर परिवाराला हा संबंध मान्य नाही. काही दिवसांपूर्वी शशि कपूर यांनी दोघाचं लग्न होणार असल्याच्या चर्चेला बळ दिलं होतं पण तरी दोघंही रिलेशनशिप कायम ठेवण्यात फेल झाले.