लॉस एंजलीस (अमेरिका) : भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.
ऑस्कर पुरस्कार खरे तर नामांकने देऊन दिले जातात. पण यातील वैज्ञानिक आणि तांत्रिक विभागाचे काही पुरस्कार मात्र मुख्य ऑस्कर सोहळ्याच्या आधीच प्रदान केले जातात. यंदा ते १३ फेब्रुवारीला देण्यात येणार आहेत.
राहुल आणि त्याचा सहकारी रिचर्स चॅग यांनी 'अॅडव्हान्स प्लेबॅक फिचर्स' या प्रकारात गेल्या दशकभरात भरीव कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांना हा विशेष ऑस्कर देऊन गौरवण्यात येणार आहे.
'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅन्ड आर्ट्स' या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार जिंकणं हे सिनेमाशी संबंधीत प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.