प्रत्युषा गर्भवती होती, राहुलनं दिली कबुली

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यानं तोंड उघडलंय. 

Updated: Apr 20, 2016, 02:14 PM IST
प्रत्युषा गर्भवती होती, राहुलनं दिली कबुली title=

मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यानं तोंड उघडलंय. 

मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, राहुल राज सिंग यानं पोलिसांनी दिलेल्या आपल्या जबानीत प्रत्युषानं गर्भपात केल्याचं कबूल केलंय. राहुलच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येच्या अगोदरच्या दिवशी प्रत्युषानं गर्भपात केला नव्हता तर ती खूप अगोदरपासून गरोदर होती. जानेवारी महिन्यातच तिनं गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. 

कॅमेऱ्यासमोर काय म्हणाला राहुल

कॅमेऱ्यासमोर मात्र राहुलनं आपल्यावर विनाकारण आरोप केले जात असल्याचं म्हटलंय. प्रत्युषा कर्जात बुडालेली होती हेही त्यानं यावेळी कबूल केलंय. मात्र, तिचे सगळे बँक अकाऊट तिचे आई वडील हाताळत असल्याचंही त्यानं म्हटलंय. 

प्रत्युषा तीन महिन्यांची गर्भवती 

दोन दिवसांपूर्वीच जे जे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी प्रत्युषा तीन महिन्यांची गर्भवती होती आणि तिनं गर्भपाताचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट केलं होतं.

प्रत्युषाची आत्महत्या... 

२४ वर्षीय प्रत्युषा १ एप्रिल रोजी गोरेगाव स्थित आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. तिचा लिव्ह इन पार्टनर राहुल राज सिंह यानं अंधेरीतल्या एका हॉस्पीटलमध्ये प्रत्युषाला हलवलं होतं. इथं तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर राहुलविरुद्ध प्रत्युषाला आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.