मुंबई : हृतिक रोशन, यामी गौतम स्टारर 'काबिल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय संजय गुप्ता यांनी... नेत्रहीन रोहन भटनागर आणि सुप्रिया या दोघांची ही गोष्ट...
रोहन एक डबिंग आर्टिस्ट आहे तर सुप्रिया एक पियानो वादक... या दोघांची भेट होते, भेटीनंतर त्यांच्यात प्रेम होतं आणि मग लग्न... एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेल्या या दोघांच्या सुखी संसाराला नजर लागते ती माधवराव शेलार या स्थानिक कॉर्पोरेटरच्या भावाची... यानंतर काय घडतं तो सस्पेन्स आम्ही उलगडत नाही त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल...
खरं तर रईस असो किंवा 'काबिल' या दोन्ही सिनेमांची स्टोरीलाईन ही टिपीकल बॉलिवूड फॉर्म्युल्यावर आधारित आहे. रईस जिथे गरीबो का मसिहा आहे, तिथेच काबिल एक रिव्हेन्ज स्टोरी आहे. सिनेमाच्या कथेत नाविन्य नसलं तरी मांडणीत थोडं फार नाविन्य पहायला मिळतं... एखादी अंध व्यक्ती कशी राहते, त्यांच्या रोजच्या जगण्यातला अभ्यास व्यवस्थित करुन, सिनेमात त्या त्या गोष्टी मांडण्यात आल्यात.
खरं तर काबिल हा सिनेमा पाहिल्यानंतर कुठेतरी वरुण धवनच्या बदलापूर या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्या सिनेमातही हिरोईनच्या मृत्यूनंतर हिरो पूर्ण सिनेमात दोषींचा बदला घेत राहतो... या सिनेमातही अशीच एक रिव्हेन्ज स्टोरी तुम्हाला पहायला मिळणार आहे. फरक एवढाच की या सिनेमातला नट एक अंध व्यक्ती आहे.
सिनेमाचं संगीत सुंदर आहे. काबिल, सारा जमाना, मॉन अमॉर ही गाणी छान झालीत. हृतिक रोशनचा अभिनयही कमाल झालाय. सिनेमाचा इंटरवलनंतरचा भाग इम्पॅक्टफूल वाटतो, तुम्हाला होल्ड करुन ठेवतो.. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या टिपीकल फॉर्मुल्यावर आधारित काबिल हा सिनेमा आहे. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला आम्ही देतोय 3 स्टार्स...