'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार!

मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे.

Updated: Mar 3, 2016, 01:10 PM IST
'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार! title=

मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे... आणि तीही मोठ्या पडद्यावर...

कारण, येत्या रमझान ईदला दोघांचेही चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होणार आहेत. बॉलिवूडमधील यावर्षीची ही सर्वात मोठी टक्कर असेल, असं मानलं जात आहे.

सलमान खानचा 'सुल्तान' आणि शाहरुख खानचा 'रईस' हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होणार आहेत.

बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार यशराज फिल्म्सच्या वेबसाईटवर सुल्तान येत्या ईदला प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि यात कोणताही बदल होणार नसल्याचे म्हटले आहे.

तर 'रईस'चे निर्माते रितेश सिधवानी यांनीही त्यांचा चित्रपट कोणत्याही इतर दुसऱ्या तारखेला प्रदर्शित केला जाणार नाही, असे म्हटले आहे.

आता येत्या ईदला दोन खान आणि त्यांच्या फॅन्समध्ये जोरदार टक्कर होणार यात काही वाद नाही.