सख्ख्या नाही तर चुलत भावानं दाबला कंदीलचा गळा

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानं गळा दाबून हत्या केली होती.

Updated: Jul 31, 2016, 03:37 PM IST
सख्ख्या नाही तर चुलत भावानं दाबला कंदीलचा गळा  title=

इस्लामाबाद : पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानं गळा दाबून हत्या केली होती. या प्रकरणाला आता वेगळच वळण लागलं आहे. कंदीलचा गळा तिच्या सख्ख्या भावानं नाही तर चुलत भावानं दाबल्याचं आता समोर आलं आहे. पॉलीग्राफ टेस्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. 

सुरुवातीला कंदीलचा सख्खा भाऊ मोहम्मद वसीमनं हत्या केल्याचं कबूल केलं होतं, पण दोन्ही आरोपींची पॉलीग्राफ टेस्ट केल्यानंतर वसीमच्या दाव्याविषयी संशय निर्माण झाला आहे. 

15 जुलैला कंदील बलोचची हत्या करण्यात आली होती. जियो न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार वसीमनं कंदीलचे हात आणि पाय पकडले तर नवाजनं तिचा गळा दाबला. हत्या करण्यापूर्वी कंदीला नशेचं औषध देण्यात आल्याचाही आरोप होत आहे. 

कंदीलचा सौदीमध्ये राहणाऱ्या मोठ्या भावानं कुटुंबाचं नाव खराब होत असल्याचं सांगून वसीमवर कंदीलची हत्या करण्यासाठी दबाव आणल्याचंही बोललं जात आहे.