यंदा प्रियांकाला आई बनायचंय!

बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा हिला ती लग्न कधी करणार याबद्दल अजून काही शाश्वती नाही... मात्र, प्रियांकाला यंदाच्या वर्षात आई बनायचंय...

Updated: Feb 4, 2015, 08:18 AM IST
यंदा प्रियांकाला आई बनायचंय! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा हिला ती लग्न कधी करणार याबद्दल अजून काही शाश्वती नाही... मात्र, प्रियांकाला यंदाच्या वर्षात आई बनायचंय...

एका मुलाखतीत खुद्द प्रियांकानं तिला आई व्हायचं असल्याचं सांगितलंय. प्रियांक सध्या तिच्या करिअरच्या टॉप स्थानावर आहे. यावर्षी, तिचे तब्बल चार सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

प्रत्येक सिनेमात तिची भूमिका वेगळी असणार आहे. झोया अख्तरचा 'दिल धडकने दो' आणि संजय लीला भन्साळीचा 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात ती दिसणार आहे.

मधुर भांडरकर बनवत असलेल्या 'मॅडमजी' आणि प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'गंगाजल 2' या सिनेमतही दिसेल.

मॅडमजी हा सिनेमा प्रियांकाच्या होम प्रोडक्शनमध्ये तयार होतोय... त्यामुळे, या सिनेमाची प्रोड्युसरही प्रियांकाच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.