सनी लियॉनच्या मस्तीजादेंचं शुटिंग सुरू

आपल्या दिलखेच अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लियॉनने आपला नवा सेक्स कॉमेडी असलेल्या चित्रपटाचं शुटिंग अखेर सुरू केलं आहे. सनी लियॉनने रविवारी मायक्रोब्लॉगिंग साईटवर ट्विटरवर लिहलंय, देवा माझ्या नव्या चित्रपटाला आशीर्वाद दे. 

Updated: Sep 8, 2014, 06:04 PM IST
सनी लियॉनच्या मस्तीजादेंचं शुटिंग सुरू title=

मुंबई : आपल्या दिलखेच अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लियॉनने आपला नवा सेक्स कॉमेडी असलेल्या चित्रपटाचं शुटिंग अखेर सुरू केलं आहे. सनी लियॉनने रविवारी मायक्रोब्लॉगिंग साईटवर ट्विटरवर लिहलंय, देवा माझ्या नव्या चित्रपटाला आशीर्वाद दे. 

जर माझे आईवडिल पाहत असतील तर माझ्या या मस्तीजादे या चित्रपटासाठी त्यांनीही आशीर्वाद द्यावा. मस्तीजादे चित्रपटाचे निर्देशक मिलाप झवेरी आहेत. मिलाप यांनी एक व्हिलन, ग्रँड मस्ती सारख्या सिनेमांची पटकथा लिहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निर्देशक मिलाप झवेरी यांचा सेक्स कॉमेडी चित्रपट मस्तीजादेंमध्ये तुषार कपूर सनी लियॉनसोबत रोमान्स करतांना दिसणार आहे. याआधीही तुषार कपूरने क्या कूल है हम आणि क्या सूपर कूल है सारख्या सेक्स कॉमेडी चित्रपटात अभिनय साकारला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.