मुंबई: प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.
प्रियंकाचा न्यू लूक तिच्या फॅन्सना खूप आवडतोय. ते wow, beautiful and cool सारख्या शब्दांनी तिची स्तुती करत आहेत. प्रियंकाचा हा नवा लूक कोणत्या चित्रपटासाठी आहे हे अजून कळलं नाहीय. यापूर्वी २०१०मध्ये ‘अंजाना-अंजानी’ चित्रपटासाठी प्रियंकानं शॉर्ट हेअर्स ठेवले होते.
प्रियंकानं आपल्या नव्या लूकबद्दल ट्विटरवर लिहिलंय आणि नंतर फेसबुकला फोटो शेअर केलाय.
Hold on! We can't breathe! Wowzer #PCsNewLook https://t.co/kbqZA1A2Cz
— Team Priyanka Chopra (@TeamPriyanka) January 17, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.