वर्णभेदामुळे मला अमेरिका सोडावं लागलं - प्रियांका

अमेरिकेत आपल्यालाही वर्णभेदाला सामोरं जावं लागलं... तेही इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यामुळे आपल्याला अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा प्रियांका चोप्रा हिनं नुकताच केलाय. 

Updated: May 28, 2015, 04:09 PM IST
वर्णभेदामुळे मला अमेरिका सोडावं लागलं - प्रियांका title=

मुंबई : अमेरिकेत आपल्यालाही वर्णभेदाला सामोरं जावं लागलं... तेही इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यामुळे आपल्याला अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा प्रियांका चोप्रा हिनं नुकताच केलाय. 

12 वर्षांची असताना प्रियांकाला अमेरिकेत शिक्षणासाठी धाडण्यात आलं होतं. परंतु, इथं शाळेत तिला वर्णभेदाला सामोरं जावं लागलं. मला आठवतं की जेव्हा मी शाळेत शिकत होते तेव्हा तिथं मला सगळे जण 'ब्राऊनी' म्हणत हिणवत होते, असं प्रियांकानं म्हटलंय. 

अमेरिकेत भारतीयांकडे नेहमीच एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. भारतीय लोक डोकं हलवत बोलतात, असं म्हणून तिथं भारतीयांची टर उडवली जाते तसंच आपल्या शैलीचीही टर उडवली जातं. यालाच कंटाळून मी अमेरिका सोडून भारतात परतले होते, असं प्रियांकानं म्हटलंय. 

प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, मूळ भारतीय असलेल्या एखाद्या मुलीला हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तरी ती एखाद्या भारतीय कुटुंबातील एखादी भूमिका असते (उदाहरणार्थ इंडियन आई) किंवा अशी एखादी मुलगी जी अरेंज मॅरेजचं कल्चर दर्शवते. 

आज अमेरिकेतल्या एका हॉलिवूड प्रोडक्शनचा भाग असलेल्या प्रियांकाला आत्ता मात्र अमेरिकेचा भारताकडे पाहण्याच दृष्टीकोन थोडाफार बदलल्याचं जाणवतंय. प्रियांका सध्या हॉलीवूडचा एक कार्यक्रम 'क्वान्टिको'मध्ये एलेक्स वीवर नावाच्या एफबीआयच्या एजंटच्या भूमिकेत दिसतेय. 

या कार्यक्रमात माझी भूमिका एक अभिनेत्री म्हणून असावी... केवळ एक भारतीय म्हणून नाही, याच अटीवर मी या कार्यक्रमात काम करण्यास होकार दिल्याचंही प्रियांकानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.