प्रियंका चोपडाची सोशल नेटवर्किंगवर धमाल

सोशल नेटवर्किंग साईट ट्वीटरवर अभिनेत्री प्रियंका चोपडा चमकली आहे कारण, प्रियंकाने ट्वीटरवर ७० लाख फॉलोअर्स मिळवले आहेत.

Updated: Sep 21, 2014, 07:26 PM IST
प्रियंका चोपडाची सोशल नेटवर्किंगवर धमाल title=

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्वीटरवर अभिनेत्री प्रियंका चोपडा चमकली आहे कारण, प्रियंकाने ट्वीटरवर ७० लाख फॉलोअर्स मिळवले आहेत.

३२ वर्षांची प्रियंका चोपडा  जानेवारी २००९ मध्ये ट्वीटरवर आली होती, सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रियांकाने चाहत्यांना धन्यवाद म्हटलं आहे. 

प्रियंकाने म्हटलं आहे. धन्यवाद ७० लाख प्रशंसक आपलं परिवार मोठं होतंय, आपलं माझ्यावरचं प्रेम असंच वाढत जाओ.
 
प्रियंका सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करते,  ती ट्वीटरवर सर्वात चौथी लोकप्रिय सेलिब्रिटी ठरली आहे. 

महानायक अमिताभ बच्चन यांचे एक कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर शाहरूख खानचे ९० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर आमीर खान ८४ लाख आणि सलमान ८२ लाखांवर जाऊन पोहोचलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.