मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटाची मैत्रीण आणि तिच्या इमारतीत राहणारी पारुल खन्ना हिचा जबाब मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोंदवलाय. तर किंग्ज़ इलेव्हन पंजाब टिमचे सीईओ फ्रेजर केस्लिन यांनी मात्र जबाबात प्रिती आणि नेस यांचे भांडण बघीतलं नसल्याचं पोलीसांना सांगितलय.
या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि प्रितीचा मित्र जीनचा जबाब पोलिसांना मेलद्वारे मिळालाय. तर शैलेस गुप्ता हा साक्षीदार जबाबासाठी अजून आला नाही. तर दुसरीकडे नेस वाडीया याने पोलिसांना सामोरं जाण्याची पूर्ण तयारी केलीये. त्याने जवळपास ३० साक्षीदारांची लिस्ट तयार केली आहे.
दरम्यान, प्रिती झिंटानं पुन्हा एकदा आपली बाजू फेसबुकवर मांडली आहे. आयपीएल व्यवहारापोटी मी नेस वाडियाला 5 कोटी रुपये दिले, अशी माहिती देताना अंडरवर्ल्ड डॉनच्या धमकीचं प्रकरण आश्चर्यकारक आहे, असं प्रितीने म्हटलंय. प्रितीने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केलीये. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती. वानखेडे स्टेडीयमच्य गरवारे पॅव्हेलियमध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. पोलिसांनी नेस वाडीया यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.