लॉस एन्जेलिस : वयाच्या केवळ सातव्या वर्षी आपण बलात्काराचं शिकार झाल्याचं मॉडेल केटी प्राईस हिनं म्हटलंय.
सात वर्षांची असताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीनं बलात्कार केला होता, अशी आपली कहाणी केटीनं कथन केलीय. एका मॅगझीननं दिलेल्या बातमीनुसार, केटीनं नुकताच हा खुलासा फ्युबर रेडिओ कार्यक्रमात केलाय.
सध्या चार मुलांची आई असलेल्या केटी प्राईसनं रेडिओ कार्यक्रमादरम्यान बोलताना, 'त्यावेळी मी केवळ सात वर्षांची होते. माझी आई आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती आणि मी खेळत होते. मला आजही त्या व्यक्तीचा चेहरा आठवतोय. तुम्ही अशा व्यक्तींना कधीच विसरू शकत नाहीत' असं म्हणत आपबीती कथन केली.
'जेव्हा मी खूप छोटी होते तेव्हा पुरुषांनी माझं लैंगिक शोषण केलं. मीही या परिस्थितींमधून गेलेय' असं तीनं म्हटलंय. यावर, या घृणास्पद आठवणींतून स्वत:ची सूटका कशी केलीस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला, तेव्हा या ३६ वर्षीय ग्लॅमरस मॉडेलचं उत्तर होतं, 'तुम्हाला तुमचं जीवन जगायचं असतं. मी खूश आहे आणि माझी मुलंही आहेत. तुम्ही या आठवणी विसरू शकत नाही... पण त्या तुम्हाला केवळ दु:खच देतात'.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.