'पोश्टर बाईज'नंतर 'पोश्टर गर्ल' प्रेक्षकांच्या भेटीला

पोस्टर गर्ल प्रेक्षकांच्या भेटीला येणार 

Updated: Dec 23, 2015, 09:24 PM IST
'पोश्टर बाईज'नंतर 'पोश्टर गर्ल' प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : मराठी चित्रपट पोश्टर बॉईज नंतर आता पोस्टर गर्ल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर गर्लचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय. यात सोनाली कुलकर्णी हटके लूकमध्ये दिसणार आहे. 

जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ मेनन, संदीप पाठक अशी कलाकारांची भलीमोठी फौज यात झळकणारे. त्यामुळे पोश्टर बॉईजनंतर आता पोश्टर गर्लची ही धमाल कशी असणारे याची उत्सुकता आता तरुणाईला लागली आहे.