सनी लिऑनवर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

अभिनेत्री सनी लिऑनच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या मोसमातील सहभागी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रा हिने या खटला सनीवर दाखल केला आहे.

Updated: Apr 5, 2016, 09:05 PM IST
सनी लिऑनवर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा title=

मुंबई : अभिनेत्री सनी लिऑनच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या मोसमातील सहभागी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रा हिने या खटला सनीवर दाखल केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सनीविरोधात खटलाही दाखल करताना, सनीने आपली बदनामी केल्याचा आरोप पूजाने केला आहे. यासाठी भरपाईपोटी तब्बल १०० कोटी रुपयांची मागणी पूजाने केली आहे. 
 
'मी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये लोकप्रिय होते. सनी लिऑनचा माझ्यानंतर या शोमध्ये आली. सनी माझ्यावर जळत होती. माझ्याबद्दल तिच्या मनात आकसाची भावना होती. त्यामुळे तिने माध्यमांमधून माझी बदनामी केली', असा आरोप पूजाने केला आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी न्यायालयात घेण्यात आली तेव्हा पूजा अनुपस्थित होती.

 पूजाने यापूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा यांच्यावर आरोप केले होते. माझी हत्या जिवे मारण्याचा त्या दोघींचा कट आहे असा आरोप पूजा मिश्राने केला होता.