'जिस्म ३' आजवरचा सगळ्यात बोल्ड सिनेमा असेल - पूजा

अभिनेत्री - सिनेनिर्माता पूजा भट्टनं एक एरोटिक थ्रिलर सिनेमा बनवण्याचं आता मनावर घेतलंय. हा नवा सिनेमा म्हणजे, 'जिस्म' या सिनेमाच्या तिसरा भाग असेल. 

Updated: Feb 10, 2016, 07:13 PM IST
'जिस्म ३' आजवरचा सगळ्यात बोल्ड सिनेमा असेल - पूजा title=

मुंबई : अभिनेत्री - सिनेनिर्माता पूजा भट्टनं एक एरोटिक थ्रिलर सिनेमा बनवण्याचं आता मनावर घेतलंय. हा नवा सिनेमा म्हणजे, 'जिस्म' या सिनेमाच्या तिसरा भाग असेल. 

'जिस्म ३' नावानं बनणारा हा सिनेमा आजवरचा सर्वात बोल्ड सिनेमा असेल. यामध्ये तीन अभिनेता आणि एक अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील. 

हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित होईल, असं पूजा सांगतेय. पण, सध्या पूजा रिचा चड्ढा अभिनित 'कॅबरेट' या सिनेमाच्या निर्मितीत बिझी आहे. 

२००३ साली आलेल्या 'जिस्म' सिनेमात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसले होते. २०१३ साली आलेल्या याच्या सिक्वेलमध्ये सनी लिओननं बॉलिवूड सिने जगतात प्रवेश केला होता.