मुंबई: अभिनेत्री आणि निर्माता पूजा भट्ट आणि तिचा नवरा मनीष मखिजा यांचं ११ वर्षांचं नातं तुटलंय. हो दोघं आता विभक्त झाले आहेत. मनीषपासून वेगळं झाल्याची माहिती पूजा भट्टनं ट्विटरवर दिली.
To all those who care & especially those that don't my husband Munna & Me have decided to part ways after 11 glorious years of marriage.
— Pooja Bhatt (@PoojaB1972) December 8, 2014
पूजानं ट्वीट केलंय, “ज्यांना आमची काळजी आहे आणि ज्यांना नाही, त्यांना सांगू इच्छिते की माझा नवरा मुन्ना आणि मी ११ वर्षांच्या लग्नानंतर आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. आमचा घटस्फोट सहमतीने आहे आणि आम्ही दोघं आजही एकमेकांचा सन्मान करतो.”
Our split as some might call it is amicable & we hold each other in the highest esteem for now and forever.
— Pooja Bhatt (@PoojaB1972) December 8, 2014
पूजानं याबद्दल माहिती देण्याचं कारण सांगितलं की, आम्ही दोघं पब्लिक डोमेन आहोत, आमचे मित्र, शुभचिंतक आणि शत्रू तर्क लावू शकता.
The reason I explain Is because we are both part of the public domain. Our friends,well wishers & foes are free to now speculate. : )
— Pooja Bhatt (@PoojaB1972) December 8, 2014
पूजा आणि मनीषनं २००३मध्ये लग्न केलं होतं. दोघं चित्रपट ‘पाप’च्या शूटिंग दरम्यान जवळ आले होते. पूजा प्रसिद्ध निर्माता महेश भट्ट यांची मुलगी आहे. तिनं आपल्या वडिलांचाच १९८९मध्ये आलेला चित्रपट ‘डॅडी’मधून अभिनयाला सुरूवात केली होती. मनीष व्यवसायानं वीजे आहे आणि मुंबईत त्याचं एक रेस्टॉरंट आहे. त्याला ‘व्ही’चॅनेलचा शो ‘द उधम सिंह शो’पासून प्रसिद्धी मिळाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.