शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधानांची हजेरी

अभिनेता आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशने लंडनचे एनआरआय परिवारातील मुलगी तरूणा अग्रवाल सोबत विवाह केला आहे.

Updated: Jan 18, 2015, 07:44 PM IST
शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधानांची हजेरी title=

मुंबई : अभिनेता आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशने लंडनचे एनआरआय परिवारातील मुलगी तरूणा अग्रवाल सोबत विवाह केला आहे.

कुश आपले वडिल शत्रुघ्न यांच्या टेलिव्हिजन प्रॉडक्शनचं काम पाहतात, त्याचा भाऊ लवने अभिनयात चांगला जम बसवला आहे. पाटणाहून खासदार असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची अभिनेत्री मुलगी सोनाक्षी देखिल लग्नात सामिल झाली.

सोनाक्षीने विवाह समारोहाचा एक फोटो टवीट केला आहे, ज्यात मोदी दिसत आहेत. या लग्नात महाराष्ट्राचे राज्य़पाल आणि मुख्यमंत्री देखिल हजर होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.