'बाजीराव-मस्तानी'चा कोर्टात 'पिंगा'

'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत असलेला विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी दाखल केली आहे. सोशल साइट्सवरही काही प्रमाणात या चित्रपटाला विरोध होत आहेत.

Updated: Nov 23, 2015, 09:48 PM IST
'बाजीराव-मस्तानी'चा कोर्टात 'पिंगा' title=

मुंबई : 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत असलेला विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी दाखल केली आहे. सोशल साइट्सवरही काही प्रमाणात या चित्रपटाला विरोध होत आहेत.

या याचिकेत निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटातील पिंगा या गाण्याबाबत पेशव्यांच्या वंशजांचा आक्षेप आहे. याचिकेत या चित्रपटामुळे मराठी माणसांच्या आणि इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्याचं सांगण्यात आलंय. 

सर्वात महत्वाचं म्हणजे 'मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही' अशी कॅचलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे, ती अयोग्य आहे. यावरून समाजात हिंदू-मुस्लिम सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती असल्याचंही याचिकेद्वारे मांडण्यात आलं आहे.

पिंगा या गाण्यावरून सुरूवातीला वादाची सुरूवात झाली आहे. आरोपांनुसार 'पिंगा' या गाण्यातील अश्लील हावभाव आणि वेशभूषा नैतिकता डळमळीत करणारी आहे. तसेच हे गाणे इतिहासाला धरून नसल्याचंही म्हटलंय, या गाण्यातून ५ ते १५ वयोगटातील मुलांच्या मनावर चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे गाणे चित्रपटातून काढून टाकण्याचीही मागणी याचिकेत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.