Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Updated: Nov 20, 2015, 12:17 PM IST
Video_संजय लीला भन्साळीच्या  'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा title=

मुंबई : पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या सिनेमातीलं पिंगा हे गाणं सध्या चांगलचं गाजतंय . या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या टॉपच्या हिरोईन्सची जुगलबंदी पहायला मिळतेय.मात्र हे गाणं वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण बाजीराव मस्तानी हा इतिहासावर आधारीत सिनेमा असून इतिहासात डोकावून पहिल्यास काशिबाई आणि मस्तानी या दोघी कधीच एकमेकींसमोर आल्या नाहीत. तसेच काशिबाई एका  पायाने अधु होत्या, असं असतांनाही या सिनेमाचा निर्माता संजय लिला भन्साळी यांनी क्रिएटिव्हीच्या नावाखाली जरा जास्तचं लिबर्टी घेतलीय. त्यामुळे बाजीराव मस्तानीतून वेगळाच इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजीराव मस्तानीतील हा पिंगा टिपीकल  भन्साळी स्टाईलचा  पिंगा असून त्यावर देवदासची छाप पहायला मिळते. त्यामुळेच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी भन्साळींच्या या पिंगा गाण्यावर टीकेचे झोड उठवलीय.. मराठी सेलिब्रेटींनी मात्र सिनेमॅटिक लिबर्टी मान्य केली पाहिजे, असं म्हटलंय.

व्हिडिओ पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.