पेशव्यांच्या वंशजांनी केली भन्साळींच्या फोटोची जाळपोळ

संजय लीला भन्साळी निर्मित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा वाद काही क्षमण्याचा नाव घेत नाहीय. आज पेशव्यांच्या वंशजांनी जाळपोळ करत या सिनेमाला असलेला आपला विरोध व्यक्त केलाय. 

Updated: Dec 12, 2015, 07:18 PM IST
पेशव्यांच्या वंशजांनी केली भन्साळींच्या फोटोची जाळपोळ title=

पुणे : संजय लीला भन्साळी निर्मित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा वाद काही क्षमण्याचा नाव घेत नाहीय. आज पेशव्यांच्या वंशजांनी जाळपोळ करत या सिनेमाला असलेला आपला विरोध व्यक्त केलाय. 

या चित्रपटात इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलंय, असा आरोप पेशव्यांच्या वंशजांनी केलाय. हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय. 

यावेळी, आपला विरोध दर्शवण्यासाठी संजय लीला भन्साळी यांचे फोटो जाळण्यात आले. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, पुष्कर पेशवे, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते.

या चित्रपटात भन्साळींनी इतिहासाचे विकृतीकरण आणि बिभत्स रूप दाखवल्याची टीका ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केली. तर चित्रपटातील गाणी व त्यात मांडण्यात आलेल्या घटनांचा निषेध करीत सिनेमा चित्रपटगृहांमध्ये चालू देणार नाही असा इशारा पेशव्यांचे वंशज व इतर संघटनांनी दिला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.