राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार

अभिनेत्री राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजय देवगनच्या प्रॉडक्शनचा असून, लीना यादवने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Updated: Sep 6, 2016, 05:42 PM IST
राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार  title=

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजय देवगनच्या प्रॉडक्शनचा असून, लीना यादवने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

राधिका आपटे या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय आदिल हुसेन, सुरवीन चावला, तनिष्ठा चॅटर्जी आणि सयानी गुप्ता यांनी सुध्दा या चित्रपटात भूमिका बजावली आहे.

'पार्च्ड' चित्रपटाचे कथानक गुजरातच्या ग्रामीण महिलांच्या जीवनावर आधारित आहे. 

ह्या चित्रपटाचा ट्रेलर 9 सप्टेंबरला लॉन्च होणार असून 23 सप्टेंबरला हा चित्रपट सिनेनागृहात झळकणार आहे.