मुंबई : अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याच्या कुटुंबीयांना आपलं राहतं घर खाली करावं लागू शकतं.
उल्लेखनीय म्हणजे, आदित्य पंचोलीचं कुटुंब जुहूच्या इस्कॉन मंदिराच्या जवळच असलेल्या या घरात 1960 पासून राहत आहे... आणि या घराचं भाडं आहे केवळ 150 रुपये...
शिवाय, काही महिन्यांपासून भाडंही न भरल्यानं या बंगल्याची मालकीण ताराबाई यांनी 1977 साली याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल आता ताराबाई यांच्या बाजुने लागलाय. मुंबई हायकोर्टानं आदित्य पंचोलीकडून करण्यात आलेल्या सगळ्या याचिका फेटाळल्यात... या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी आता आदित्यला 5 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलीय.
पंचोली कुटुंबीय याचिका दाखल करण्यात अपयशी ठरले तर त्यांनी त्यांचा राहतं घर खाली करावं लागू शकतं.
घरासंबंधी सर्व व्यवहार आदित्यचे वडील रंजन पंचोली आणि या बंगल्याची मालकीण ताराबाई यांच्यात झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.