'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणार आहे. 

Updated: Apr 27, 2017, 03:03 PM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल  title=

मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणार आहे. 

शनायाचा खोटारडेपणा गुरुनाथसमोर उघड झाल्यानंतर त्याने तिला घराबाहेर टाकलेय. तर दुसरीकडे राधिकाबाबत त्याला सॉफ्ट कॉर्नर वाटू लागलाय. त्यामुळे या वळणावर मालिकेत पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टीआरपमध्ये दुसऱ्या स्थानावर राणादा-अंजलीच्या 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. तर 'काहे दिया परदेस' तिसऱ्या स्थानावर आहे. 'चूक भूल द्यावी घ्यावी' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे तर पाचवे स्थान 'लक्स महाराष्ट्राचा फेव्हरिट कोण' या कार्यक्रमाने मिळवलेय.