'दबंग ३'साठी अभिनेत्री काजोलला ऑफर

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या दबंग-3 बाबत अशी बातमी येत आहे की, या सिनेमात अभिनेत्री काजोलला ऑफर देण्यात आली आहे. एका मॅगजिनने दिलेल्या माहितीनुसार काजोलला सलमान खानच्या विरोधात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली आहे.

Updated: Oct 25, 2016, 03:13 PM IST
'दबंग ३'साठी अभिनेत्री काजोलला ऑफर title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या दबंग-3 बाबत अशी बातमी येत आहे की, या सिनेमात अभिनेत्री काजोलला ऑफर देण्यात आली आहे. एका मॅगजिनने दिलेल्या माहितीनुसार काजोलला सलमान खानच्या विरोधात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली आहे.

अरबाज खान प्रोडक्‍शनने अजून याची अधिकृत घोषणा नाही केली. पण हे दोघं एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. जर अभिनेत्री काजोल ही सलमान सोबत या सिनेमात काम करेल तर हा दोघांचा तिसरा सिनेमा असेल. 'प्‍यार किया तो डरना क्‍या' आणि 'कुछ-कुछ होता है' मध्ये ही जोडी झळकली होती.

काजोल ही ऑफर स्विकारते की नाही हे पाहावं लागेल. ही जोडी जर पुन्हा एकत्र आली कर प्रेक्षकांमध्ये त्यांना पाहण्यासाठी उत्सूकता असेल.