मुंबई: अभिनेत्री प्रियंका चोप्राचं म्हणणं आहे की, ती आता कोणालाही नामोहरम करू शकते. प्रियंका म्हणते, प्रत्येक महिलेनं स्वरक्षणासाठी काही न काही शिकायला हवं.
प्रियंकानं आपल्या आगामी चित्रपट 'मेरी कोम'साठी बॉडी बनवली होती. आता तिची फिगर पूर्वीप्रमाणे झालीय. मात्र ती म्हणते मी आताही फिट आहे कोणालाही धूळ चाखवण्यासाठी ती मजबूत आहे.
आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरणारी प्रियंका म्हणाली, 'आज मी कोणालाही हरवू शकते, हे बघून चांगलं वाटतंय'. तिनं सांगितलं, 'आताही तुम्ही मला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवू शकता. मी इतर बॉक्सर्सना हरवू शकणार नाही, मात्र त्यांना कांटे की टक्कर देऊ शकते.'
उमंग कुमार दिग्दर्शित 'मेरी कोम' येत्या ५ सप्टेंबरला रिलीज होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.