फवाद खानवर विनोद नको, करण जोहरचा कपीलला सल्ला

भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे करण जोहरच्या ए दिल हे मुश्किल या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे.

Updated: Oct 10, 2016, 07:19 PM IST
फवाद खानवर विनोद नको, करण जोहरचा कपीलला सल्ला title=

मुंबई : भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे करण जोहरच्या ए दिल हे मुश्किल या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्यामुळे चित्रपट प्रदर्शन होऊ देणार नाही, असा इशारा मनसेनं दिला आहे.

ए दिल है मुश्किलच्या टीमकडून मात्र चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम कपील शर्मा शोमध्ये जाणार आहे. या शोवेळी फवाद खानवर कोणतेही विनोद करु नका असा सल्ला चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधीच वादात अडकल्यामुळे फवाद खानवर विनोद करून आणखी वाद न ओढवण्यासाठी चित्रपटाच्या टीमनं हा निर्णय घेतला आहे.