'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही'

देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. 

Updated: Dec 12, 2015, 10:29 PM IST
'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही' title=

नवी दिल्ली : देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. 

पाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नसल्याचं' म्हटलं आहे.  जर असं असतं तर मी भारताचं नागरिकत्व का मागितलं असतं असंही अदनान सामी याने म्हटलं आहे. 

भारताचं नागरिकत्व तुम्हाला का हवं आहे असे जेव्हा अदनान यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं 'प्रेम'.  अदनान सामी २००१ पासून व्हिजिटर्स व्हिजावर भारतात राहत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.