आमिरच्या 'पीके'वर राज्यात बंदी नाही - मुख्यमंत्री

 अभिनेता आमिर खान याच्या 'पीके' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली.

Updated: Dec 31, 2014, 02:59 PM IST
आमिरच्या 'पीके'वर राज्यात बंदी नाही - मुख्यमंत्री title=

मुंबई :  अभिनेता आमिर खान याच्या 'पीके' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली.

हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला असल्याने त्यावर बंदी घालण्याचा प्रश्नच नाही, असे फडणवीस म्हणाले. पूर्ण संरक्षणात सुरु पीके सिनेमा सुरु राहिल, असं ते म्हणालेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये 'पीके' करमुक्त करण्यात आला आहे.

आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेला 'पीके' चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पीके'मुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत या चित्रपटाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

देशात ठिकठिकाणी या चित्रपटाविरोधात आंदोलन केले जात आहे. अहमदाबाद, भोपाळ येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे खेळ बंद पाडले. निदर्शकांकडून आमिर खानचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची टांगती तलवार दिसत होती. त्यातच राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी या चित्रपटाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितल्याने चित्रपटावरचं संकट आणखीच गडद बनलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनीच चित्रपटावरील बंदीची शक्यता फेटाळून लावत. गृह राज्यमंत्र्यांच्या निर्णयाला छेद दिला.

तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही सिनेमा  करमुक्त केल्याचीत घोषणा केली. त्यामुळे 'पीके'ला करमुक्ती देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सलमानने या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले आहे. 'अमेझिंग मूव्ही' म्हणत सलमानने ट्विट करत आमिरचे कौतुक केले. पूजा बेदी, उदय चोप्रा, रणवीर शौरी, निर्माते रितेश सिधवानी, शेखर कपूर, करण जोहर अशी मंडळीही आमिरच्या पीकेची पाठराखण करण्यासाठी पुढे आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.