फिल्म रिव्ह्यू - निळकंठ मास्तर... क्रांतिकारकाची प्रेम कथा

स्वातंत्र्यापूर्व काळाची ही गोष्ट.. निळकंठ मास्तर नावाच्या एका तरुण क्रांतिकारकाची प्रेम कथा यात मांडण्यात आली आहे.. निळकंठ मास्तर, इंदू आणि यशोदा या तीन तरुणांच्या भवती सिनमेाची गोष्ट गुंफण्यात आली आहे.. एकीकडे इंदूचं निळकंठवर प्रचंड प्रेम असताना निळकंठ मात्र देशप्रेमात आपलं सर्वस्व अर्पण करायच्या मार्गावर असतो.. या तिघांच्या संघर्षाची आणि प्रवासाची ही गोष्ट आहे..

Updated: Aug 8, 2015, 05:52 PM IST
फिल्म रिव्ह्यू - निळकंठ मास्तर... क्रांतिकारकाची प्रेम कथा title=

जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : स्वातंत्र्यापूर्व काळाची ही गोष्ट.. निळकंठ मास्तर नावाच्या एका तरुण क्रांतिकारकाची प्रेम कथा यात मांडण्यात आली आहे.. निळकंठ मास्तर, इंदू आणि यशोदा या तीन तरुणांच्या भवती सिनमेाची गोष्ट गुंफण्यात आली आहे.. एकीकडे इंदूचं निळकंठवर प्रचंड प्रेम असताना निळकंठ मात्र देशप्रेमात आपलं सर्वस्व अर्पण करायच्या मार्गावर असतो.. या तिघांच्या संघर्षाची आणि प्रवासाची ही गोष्ट आहे..
 
पडद्यावर कसा आहे चित्रपट
सिनेमाचं सादरीकरण स्वतंत्र्यापूर्वीच्या काळातलं असल्यामुळे त्या त्या गोष्टींवर भरपूर लक्षपूर्वक काम करण्यात आलंय.. सिनेमात भव्यता दिसून येते.. सिनेमाची सिनेमॅटॉग्राफी छान झाली आहे.. निळकंठचं कलादिग्दर्शनही नेटकं झालंय..

कसं झालं दिग्दर्शन
दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांनी या सिनेमाला दिलेली ट्रिटमेंट अनेक ठिकाणी खटकते.. हा सिनेमा जरी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेला असला तरी त्या सिनेमातली त्याची विचार करण्याची प्रक्रिया खूपच कन्यफ्युझिंग वाटते.. एकीकडे सिनेमात स्वतंत्र्यापूर्व काळातला संघर्ष मांडण्यात आलाय तर दुसरीकडे याच तरुणांची प्रेमकथाही रंगवण्यात आलीये..

कसा झाला अभिनय
अभिनेता ओंकारनं या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली असून या व्यक्तिरेखेला न्याय देण्यात मात्र त्याला यश मिळालंय का, या बाबत शंकाच वाटते..
अभिनेत्री पूजा सावंत ही निळकंठ मास्तर या सिनेमात ती खूप छान प्रेझेंट झाली असली तरी तिच्या भूमिकेला हवं तितकं justification मिळालं नाहीये, हे सिनेमा पाहताना जाणवतं.. विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा सुंदर झाल्या आहेत..
 
अजय-अतुलचं संगीत कसं आहे... 
अजय अतुल यांचं संगीत छान वाटतं.. सिनेमाच्या थीमला ते एकदम अॅप्ट ठरलंय..
अधीर मन झाले, वंदे मातरम ही गाणी श्रवणीय आहेत.. 
 
काय खटकतंय
सिनेमातली एक गोष्ट जी खटकते ती म्हणजे, निळकंठ मास्तर ही एक प्रेम कहाणी असल्यामुळे यातल्या कथेला आणि त्यातल्या पात्रांना किती न्याय मिळालाय हे सांगणं मात्र कठीण वाटतं.. इंदू आणि निळकंठचं जर एकमेकांवर प्रेम आहे किेवा एकेकाळी असतं... तर ते establish करण्यात दिगदर्शक य़शस्वी झाला नाहीये.. सिनेमाच्या शेवटी देखील यशोदा आणि निळकंठ यांच्या मनात काय होतं किंवा ते खरंच एकमेकांवर त्याचं प्रेम होतं का.. याबाबत confusion जोणवतं..
 
सिनेमातल्या कलाकाराचे परफॉर्मेंसेस, कला दिगदर्शन, सिनेमाटॉग्राफी या सगळ्या गोष्टी पाहता या सिनेमाला मी देतेय 2.5 स्टार्स..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.