अमिताभ बच्चन यांना पद्म पुरस्कार; नवीन रेकॉर्ड कायम

देशातील दुसरा सर्वौच्च नागरिकचा पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना आज प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण पार पडलं. यावेळी अमिताभ बच्चन आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. 

Updated: Apr 8, 2015, 12:15 PM IST
अमिताभ बच्चन यांना पद्म पुरस्कार; नवीन रेकॉर्ड कायम title=

नवी दिल्ली : देशातील दुसरा सर्वौच्च नागरिकचा पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना आज प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण पार पडलं. यावेळी अमिताभ बच्चन आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. 

महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक रेकॉर्ड मोडले तर अनेक नवीन रेकॉर्ड कायमही केले. आज पुन्हा एकदा अमिताभ पद्म पुरस्कारावेळी आणखी एक रेकॉर्ड करणार आहेत. ते म्हणजे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा... मग तो पुरस्कार त्यांच्या पित्याला मिळाला असो किंवा पत्नीला किंवा मुलाला किंवा सुनेला... 

बच्चन कुटुंबात सहाव्यांदा पद्म पुरस्कार मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे, या सर्व पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्याला स्वत: बीग बी अमिताभ बच्चन यांनी जातीनं हजेरी लावलीय. सहा पद्म मिळवण्याचा बहुमान एकट्या 'बच्चन' कुटुंबाला मिळालाय.  

'बच्चन' कुटुंबातले पद्म पुरस्कार...
- पहिल्यांदा हरिवंशराय बच्चन यांना पद्म भूषण
- दुसऱ्यांदा अमिताभ यांना पद्मश्री
- तिसऱ्यांदा स्वत: अमिताभ यांना पद्म भूषण 
- चौथ्यांदा जया बच्चन यांना पद्मश्री
- पाचव्यांदा ऐश्वर्या राय-बच्चन यांना पद्मश्री
- सहाव्यांदा स्वत: अमिताभ बच्चन यांना पद्म विभूषण

यातील पाच वेळा अमिताभ बच्चन पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. तर आता सहाव्यावेळी उपस्थित राहून रेकॉर्ड करणार आहेत. चित्रपट क्षेत्रातील बहुमोल्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्थानी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यांचा आत्तापर्यंतचा शेवटचा चित्रपट आहे 'शमिताभ'... 'जंजीर', 'अभिमान', 'सौदागर', 'रोटी, कपड़ा और मकान', 'दीवार', 'शोले', 'डॉन', 'लावारिस', 'सत्ते पे सत्ता', 'नमक हलाल', 'कूली', 'आक्रोश', 'चीनी कम', 'निशब्द', 'सरकार राज', 'ब्लैक' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनयाची जादू दाखवून दिली. 

बिग बी लवकरच पीकू आणि वजिर चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकासमोर येणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.